esakal | हनीट्रॅपच्या जाळ्यातून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद; तोतया पत्रकाराला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

हनीट्रॅपच्या जाळ्यातून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद; तोतया पत्रकाराला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - भाजी विक्रेत्यास हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून युट्यूब न्युज चॅनेल व संघटनेच्या नावाखाली ब्लॅकमेल करून त्याच्याकडुन खंडणी उकळणाऱ्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये एका तोतया पत्रकारासह चार जणाचा समावेश आहे.

राहूल मच्छिंद्र हरपळे (वय 33, रा. फुरसूंगी), संतोष उर्फ शिवा उत्तम खरात, स्वप्निल विजय धोत्रे (वय 24, रा. कोंढवा), मारूती लहू निचित, अनिल जगन्नाथ  बोटे (वय 34, रा. तुकाई टेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 38 वर्षीय भाजीविक्रेत्याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवप्रहार संघटनेच्या अनिल बोटे, महाराष्ट्राचा प्रहार न्यूजच्या तोतया पत्रकार राहूल हरपळे याच्यासह इतर साथीदारांवर खंडणी, जीवे ठार करण्याची धकमी देणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाजी विक्रीचा व्यवासाय आहे. 10 सप्टेंबर रोजी त्यांच्या ओळखीच्या स्वप्निल धोत्रेने त्यांना फोन करुन पबला जाण्यासाठी बोलवले होते. त्यांच्यासोबत राहुल हरपळे व दोन मुलींना घेऊन ते कोरेगाव पार्क येथील एका पबला गेले. क्लबमध्ये फिर्यादीची एका मुलीसोबत जवळीक झाली. त्यानंतर तेथून सर्वजण घरी निघाले होते. फिर्यादींनी व त्यांच्यासोबत असलेल्या मुलीने घरी जाताना रस्त्यात पावभाजी खाल्ली. तेथे दोघांची जवळीक वाढल्याने दोघांनी एका लॉजवर जाऊन शरीरसंबंध ठेवले. दरम्यान दोन दिवसांनातर फिर्यादींच्या भाजीच्या दुकानावर राहुल हरपळे, अनिल बोटे, स्वप्निल धोत्रे व एक मुलगी दाखल झाली. यानंतर अनिल बोटे याने गाडीतून उतरुण "तु संबंधीत मुलीवर बलात्कार केला आहेस, आम्ही तुझ्याविरुध्द पोलिसात तक्रार देणार आहोत. जर तक्रार करायची नसेल तर पाच लाख रुपये आणून दे" अशी मागणी केली.

यानंतर दुसर्‍या दिवशी फिर्यादी अनिल बोटेला समजावण्यासाठी राहुल हरपळे याच्या हडपसर मेगा सेंटरमधील कार्यालयात गेले होते. तेव्हा पैसे न आणल्याने बोटेने फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादींनी घर गाठले. त्यानंतर फिर्यादींचा मित्र स्वप्निल माने याने त्यांना फोन करून सांगितले की, अनिल बोटे हा त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गेला आहे. त्यानंतर फिर्यादींनी स्वतः पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. हा प्रकार हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे लोणीकाळभोर पोलिसांनी तो गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

loading image
go to top