उरुळी कांचन येथे टोळीयुद्ध भडकले

भरदिवसा झालेल्या गोळीबारात वाळु व्यावसायिकासह दोघांचा खुन, दोघेजण जखमी
crime
crime sakal

उरुळी कांचन/पुणे : उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता चार ते पाच जणांच्या टोळक्‍याने वाळू व्यावसायिकावर अंधाधूंद गोळीबार करून त्याचा खुन केला. तर संबंधीत व्यावसायिकाच्या अंगरक्षकाने प्रत्युउत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये टोळीतील एकाला गोळी लागून त्याचाही मृत्यु झाला. तर व्यावसायिकाचा अंगरक्षक या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भरदुपारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने दौंड व हवेली तालुक्‍यात भितीचे वातावरण पसरले आहे. गोळीबाराची घटना पुर्ववैमनस्य व टोळीयुद्धातुन झाली असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

संतोष संपतराव जगताप (वय 32, रा. चंदननगर, मुळ रा. राहू, दौंड), स्वागत बापू खैरे (वय 25, रा. जुनी तांबे वस्ती, उरुळी कांचन) असे गोळीबारामध्ये मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. तर शैलेश सिंग (वय 25) व मोनु सिंग (वय 26, दोघेही रा. चंदननगर) हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

crime
'समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर...' नवाब मलिक यांना इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जगताप हा त्याच्या काही साथीदारांसमवेत शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील तळवाडी चौकातील सोनाई हॉटेल येथे जेवणासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर तो त्याच्या साथीदारांसह हॉटेलमधून बाहेर पडला. संतोष त्याच्या वाहनामध्ये बसत असतानाच कारमधून आलेल्या चार जणांनी संतोषवर एकापाठोपाठ पाच गोळ्या झाडल्या. या गोळ्या संतोषच्या छाती, कंबर व खुब्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी संतोषचे अंगरक्षक शैलेश सिंग व मोनुसिंग यांच्यावरही गोळीबार केला. त्यामध्ये ते दोघेही जखमी झाले. दरम्यान, शैलेश सिंग याने प्रत्युत्तरादाखल हल्लेखोरांवर गोळीबार केला. त्यामध्ये हल्ला करणाऱ्या स्वागत खैरेला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा दोघांचाही मृत्यु झाल्याचे डॉक्‍टारांनी घोषीत केले. या घटनेनंतर संतोष व त्याच्या अंगरक्षकांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचेही मृतदेह ससून रुग्णालयात आणल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच पुर्व प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांनी यांच्यासह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जगताप व त्याच्या साथीदाराची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

आप्पा लोंढे टोळीविरुद्ध विष्णू जाधव टोळी "कनेक्‍शन'

राहू येथे बेकायदा वाळू उपसा केल्याच्या कारणावरुन 2011 मध्ये दौंड बाजार समितीचे तत्कालीन संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा संतोष जगताप याच्यावर आरोप होता. या प्रकरणामध्ये संतोष जामीनावर कारागृहातुन सुटला होता. शुक्रवारच्या घटनेतील हल्लेखोर स्वागत खैरे हा आप्पा लोंढे खुन प्रकरणातील आरोपी असून तो विष्णू जाधवच्या टोळीतील सदस्य असल्याची शक्‍यता आहे.

हल्ला होण्याची संतोषला मिळाली पुर्वसुचना

संतोष जगताप हा कामानिमित्त केडगाव चौफुला येथे गेला होता, तेथूनच त्याच्यावर कारमधून काहीजण पाळत ठेवत होते. संतोषला त्याबाबत पुर्वसुचनाही मिळाली होती. त्यामुळे तो तत्काळ उरुळी कांचन येथे आला. दुपारी जेवण करण्यासाठी तो हॉटेलमध्ये गेला, त्यांने हॉटेल चालकास शटर बंद करण्यास सांगून त्याने जेवण केले. बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर गोळीबार झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com