Kondhwa News : गंगामाता चौक ते शत्रुंजय मंदिर मुख्य रस्त्यावर महिनाभरापासून ड्रेनेजचे पाणी; महापालिकेचे दुर्लक्ष

गंगामाता चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Drainage water on main road
Drainage water on main roadsakal

कोंढवा - गंगामाता चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व्हिआयआयटी चौकात ड्रेनेज वाहिनी तुंबल्याने ऐन मुख्य रस्त्यावर पाणी साचत आहे. ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करत याठिकाणी प्रवास करावा लागतो. मात्र, महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

संडासचे पाणी रस्त्यावर येऊन एकमेकांच्या अंगावर उडाल्याने वाद झाल्याच्या घटनाही याठिकाणी झाल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणाची भूमिका घेण्यात येत आहे. हा संपूर्ण रस्ताच ड्रेनेजच्या पाण्याने व्यापून टाकला असल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्त होत आहे. ड्रेनेजच्या पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तर परसरलीच आहे. शिवाय, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला आहे.

या रस्त्यावर सातत्याने रहदारी असून रस्ता अरुंद आहे. मार्केट यार्ड आणि शहरात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे ड्रेनेजच्या पाण्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहतूकोंडीला निमंत्रण मिळत आहे. सकाळी आणि संध्याकाळी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत याठिकाणी ड्रेनेजसह रस्त्याची दुरुस्ती करावी ही मागणी होत आहे.

प्रतिक्रिया -

मी रस्त्यावरून दररोज प्रवास करतो. मात्र, दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागते. त्यात गेल्या महिनाभरापासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी सुटली असून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- प्रकाश ढेबे, वाहनचालक

ही घटना मुख्य रस्त्यावर घडलेली असल्याने दुरुस्तीसाठी अडचणी येत आहेत. मागील काही दिवसात रात्रपाळीमध्ये याठिकाणी काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. परंतु, तो यशस्वी झाला नाही. पुढील दोन दिवसात ही दुरुस्ती करण्यात येईल. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

- राजेश फटाले, उपअभियंता, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com