
चांदेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आहेत. सध्या आगामी महापालिका निवडणुकांची चाहूल लागली असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणीही सुरू आहे.
बालेवाडी (पुणे) : पुणे शहरातील बाणेर-बालेवाडी प्रभाग क्रमांक 9 चे विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांना अज्ञातांनी दिली. याबाबत माहिती मिळताच बाणेर परिसरात खळबळ उडाली आहे.
- श्वान आणि रिक्षावाल्याची हृदयस्पर्शी गोष्ट; लेखिकेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल!
चांदेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आहेत. सध्या आगामी महापालिका निवडणुकांची चाहूल लागली असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणीही सुरू आहे. चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील मातब्बर नेते मानले जातात. 2017 च्या महापालिकेच्या मागील निवडणुकीत मोदी लाटेतही पुणे शहर भाजपने मोठी मुसंडी मारली असतानाही चांदेरे निर्विवादपणे निवडून आले होते. 2013-14 मध्ये चांदेरे यांचे निकटवर्ती माणिक गांधीले यांच्यावर हल्ला झाला होता, त्यामध्ये ते सुदैवाने बचावले होते. त्यानंतर आता पुन्हा ही हल्ल्यांच्या सुपारीची बातमी परिसरात समजतात बाणेर-बालेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
- Big Breaking : MPSCने परीक्षांबाबत केले सर्वात महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर!
22 डिसेंबर रोजी नगरसेवक चांदेरे यांच्या घराबाहेरील बाजूस एक चारचाकी वाहन थांबले असून काहीजण गेटच्या बाहेर उभे असलेले त्यांच्या पत्नी यांनी पाहिले, कोण पाहिजे अशी विचारणा केली असता काही न बोलता त्या अज्ञात व्यक्ती गाडीतून निघून गेल्या. यानंतर 23 तारखेला चांदेरे यांचा मुलगा समीर याला एक फोन आला होता, तुमच्या वडिलांना मारण्यासाठी काही मुले बाणेर येथे येणार असल्याची माहिती फोनवर सांगण्यात आली.
या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराद्वारादेखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हत्येची सुपारी येरवडा कारागृहातील खुणाच्या आरोपांमध्ये शिक्षा भोगत असलेला गुंड अनिल यशवंते याला दिली असून पुढील चौकशीसाठी यशवंते याला कोर्टाकडून पोलिसांच्या ताब्यात घेतल्यानंतरच ही सुपारी देणारा आरोपी कोण आहे ते समजेल, अशी माहिती चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी दिली.
- पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल
या परिसरातील राजकीय, सामाजिक, गोरगरीब नागरिकांशी सर्व जनतेशी माझी बांधिलकी जोडलेली आहे. या जनतेशी माझी जोडलेली नाळ ही काही असंतुष्ट लोकांना सहन होत नसल्यामुळे माझ्यावर हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असावा असा संशय आल्यामुळे मी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलिस यंत्रणा करत आहे.
- बाबुराव चांदेरे, नगरसेवक
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)