श्वान आणि रिक्षावाल्याची हृदयस्पर्शी गोष्ट; लेखिकेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल!

RickshawDriver_Dog
RickshawDriver_Dog

पुणे : मानव आणि पाळीव प्राणी यांच्यातील प्रेम, जिव्हाळ्याच्या अनेक गोष्टी, किस्से आपण ऐकले, वाचले आहेत. श्वान या प्राण्याच्या निष्ठेबद्दलचे अनेक प्रसंग आपण अवतीभोवती पाहिले आहेत, अनेकांच्या तोंडून ऐकले आहेत. निष्ठा या गुणाबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा श्वान या प्राण्याबद्दल एखादं तरी उदाहरण सांगितलं जातंच. मानवाचा सर्वात जवळचा मित्र असलेला हा प्राणी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्यात एक बेवारस श्वान एका रिक्षाचालकाच्या नजरेस पजला आणि तो श्वान रिक्षा चालकाच्या कुटुंबाचा एक भाग बनला. या रिक्षाचालकाचा आणि त्याच्या श्वानाचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

लेखिका मंजिरी प्रभू या एका कार्यक्रमासंबंधी पुण्यात प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांना भेटलेल्या एका रिक्षाचालक आणि त्याच्या श्वानाशी त्यांची भेट झाली. यासंबंधीची गोष्ट त्यांनी सोशल मीडियात शेअर केली आहे. खऱ्या आयुष्यात मी सांताक्लॉजला भेटले, असं त्यांनी या पोस्ट संदर्भात म्हटलं आहे. रिक्षामधून प्रवास करत असताना एका श्वानाला ड्रायव्हरच्या शेजारी बसलेलं पाहून आश्चर्य वाटलं आणि रिक्षाचालक हरविंदर सिंग यांच्याशी या श्वानाबाबत विचारले असता त्यांनी सांगितलेल्या माहितीनंतर खूप आनंदित झाल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हा श्वान त्या शिक्षाचालकाच्या कुटुंबाचा एक भाग बनला असून तो नेहमी रिक्षासोबत असतो. रिक्षाचालक हरविंदर सिंगही त्या श्वानाची काळजी घेतात. आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्या सर्वांचे हा श्वान लक्ष वेधून घेतो. 

कशी झाली भेट 
लेखिका मंजिरी प्रभू आणि त्यांची बहीण लीना या दोघी रिक्षाने प्रवास करत असतानाची ही गोष्ट. रिक्षाने प्रवास केल्यानंतर जेव्हा पैसे देण्यासाठी त्या पुढे झाल्या त्यावेळी मंजिरी यांचे लक्ष रिक्षाचालकाच्या पायाजवळ उभ्या असलेल्या श्वानाकडे गेले. त्यांनी रिक्षा चालक हरविंदर सिंग यांना श्वानाबद्दल विचारले, तेव्हा हरविंदर यांनी त्याबाबत माहिती दिली. हरविंदर म्हणाले, 'ज्यावेळी मी या श्वानाला पाहिले, तेव्हा तो बेवारस अवस्थेत आढळला. आणि त्याला घरी जाऊन घेण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून तो माझ्यासोबत आहे. घरी असो नाहीतर रिक्षा घेऊन बाहेर जायचं असो, तो श्वान माझ्यासोबत असतो. त्यामुळे त्याच्या खाण्याची-पिण्याची सोयही मी रिक्षामध्ये करून ठेवली आहे.'

रुनी असं या श्वानाचं नाव आहे. रुनी आणि त्याचा मालक हरविंदर सिंग यांच्याबद्दल लेखिकेने आपल्या पोस्ट म्हटले आहे की, या जगात  असे काही लोक आहेत, जे प्राण्यांसाठी मदत करतात, जे खऱ्या अर्थाने संत आहेत. आपल्या मुलांना घरी एकटं ठेवण्याचा निष्काळजीपणा काही लोक करत असतात, पण श्वानाची आपल्या मुलासारखी काळजी घेणारे हरविंदरसारखे संवेदनशील लोक या जगात आहेत. हरविंदर मला ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला भेटला आणि एकप्रकारे सांताक्लॉजला मी खऱ्या आयुष्यात भेटले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com