भारत-चीन सीमेवर झाला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dagdusheth Ganpati

भारत-चीन सीमेवर झाला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष

पुणे - गणपती बाप्पा मोरया... असा जयघोष थेट अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) टेंगा व्हॅली येथील भारत चिन सीमेवर (India China Border) झाला. मंगलमूर्ती मोरयाचा गजर करीत भारतीय लष्करातील १ मराठा बटालियनच्या सैनिकांनी सीमेवरील लष्कराच्या पोस्टवर हुबेहुब दगडूशेठ गणपतीच्या (Dagdusheth Ganpati) ‘श्रीं’ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येतच असे नाही. त्यामुळे १ मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्यावतीने व्यक्त केली होती. त्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ‘श्रीं’ची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती बटालियनला गणेशोत्सवापूर्वी सुपूर्द करण्यात आली होती.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘‘मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करत असल्याने प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना तेथे करण्यात आली. अरुणाचल प्रदेशमधील सीमेवर देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल.’’