
पुणे : गणपती आणि गौराईच्या स्वागतासाठी पूजा साहित्य आणि फुलांनी बाजारपेठ सजली आहे. हळदी-कुंकू, बुक्का, कापूर, आसन, शेंदूर, अष्टगंध, वस्त्र, समई वाती, आरती पुस्तिका, उदबत्ती, फूलवाती, कापूस, रांगोळी या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची मंडई, फूलबाजारात, मार्केट यार्ड येथे लगबग दिसून आली.