
पुणे : एका लयीत पडणारे ढोलाचे ठेके, त्याला समर्पक अशी ताशाच्या काड्यांची साथ, ढोल-ताशांच्या ठेक्यांची ऊर्जा द्विगुणित करणारे झांजवादन आणि एकाच वेळेला ढोल-ताशांच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने थिरकणारे पन्नासहून अधिक भगवे ध्वज, ढोल-ताशा वादनाचा अनोखा सोहळा अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली. पुण्यातील सर्व नामवंत पथकांमधील नामवंत वादकांनी एकत्र येऊन सादर केलेला हा ‘कल्लोळ’ अनेकांच्या मनात घर करून गेला.