esakal | बालवाडी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; सणासाठी मिळणार पाच हजार उचल
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal

बालवाडी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; सणासाठी मिळणार पाच हजार उचल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या बालवाडीमध्ये मुलांना शिकविणाऱ्या शिक्षिका व सेविकांना पाच हजार रुपये उचल देण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये आज (मंगळवारी) घेण्यात आला. गणेशोत्सवासह पुढे येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात दिलासा देण्यासाठी स्थायीने हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील ४९३ बालवाडी शिक्षिका आणि ३३८ बालवाडी सेविका कार्यरत आहे. अशा एकूण ८३१ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. त्यासाठी ४१ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०१२ पासून या कर्मचाऱ्यांना दरवर्षी सणासाठी अडीच हजार रुपये उचल दिली जाते होती. पण महागाई वाढत चालल्याने खर्च ही वाढत आहे, त्यामुळे या वर्षीपासून त्यात दुपटीने वाढ करून पाच हजार रुपये उचल दिली जाणार आहे. ही रक्कम त्यांच्या दहा पगारातून प्रत्येकी५०० प्रमाणे कपात करून वसुल केली जाणार आहे.

हेही वाचा: शिरुरमधील वक्तव्याबाबत प्रवीण दरेकर यांनी महिलांची माफी मागावी

डुक्कर नियंत्रणासाठी ९० लाख

शहरातील मोकाट आणि भटकी डुक्करांना पकडून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठीचे काम फॉर्मर चॉईस या संस्थेला देण्यात आले असून, पुढील वर्षभर त्यांच्याकडून ९० लाख रुपयांपर्यंतचे काम करून घेण्यात मान्यता दिली आहे.

फॉर्मर चॉईस संस्थेने एका डुक्कर पकडण्यासाठी १ हजार ४२५ रुपये इतका दर दिला आहे. लिलावापोटी या संस्थेकडून महापालिकेला ३५६ रुपये प्राप्त होणार आहेत. महापालिकेने या कामासाठी निविदा मागवली होती, त्यामध्ये ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार भटके आणि मोकाट डुकरे पकडण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी ठेकेदारानेच वाहन व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, जुलै २०१८ ते मार्च २०२१ या कालावधीत ४० हजार ३८६ डुकरे पकडण्यात आली. याच्या लिलावातून महापालिकेला ६० लाख ७० हजार रुपये मिळाले आहेत.

loading image
go to top