esakal | शिरुरमधील वक्तव्याबाबत प्रवीण दरेकर यांनी महिलांची माफी मागावी
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Chakankar

शिरुरमधील वक्तव्याबाबत प्रवीण दरेकर यांनी महिलांची माफी मागावी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावरून त्यांचा अभ्यासाशी व वैचारिकतेशी दूरवर संबंध असल्याचे दिसत नाही, त्यांच्या वक्तव्यातून केवळ वैचारिक दारीद्रय तसेच पक्षविचारांचा वारसा व संस्कृतीच पाहायला मिळाली. या संतापजनक वक्तव्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी समस्त महिलांची माफी मागावी, अन्यथा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगविण्याची ताकद महाराष्ट्रातील रणरागिनींच्या मनगटात नक्कीच आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला.

कार्यक्रमासाठी जात असलेल्या रुपाली चाकणकर यांचे सणसवाडी (ता शिरूर) येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी चाकणकर यांनी थांबून महिलांना मार्गदर्शन करीत पत्रकारांशीही संवाद साधला. या दरम्यान शिरूर येथे झालेल्या क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत चाकणकर यांनी भाजप नेत्यांवर खरपूस शब्दात टिका केली.

हेही वाचा: अनधिकृत फलकांवर पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई

‘लाचखोरीच्या आरोपातून वाचण्यासाठी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांनी दुसऱ्यांना नैतिकता आणि नीतिमत्ता सुचवू नये. असे सांगत ‘जिकडं खोबरं तिकडंच चांगभलं’ करीत पक्ष बदलणाऱ्यांनी आपल्या मतावर ठाम राहावं, असे सांगत चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाही टिकेचे लक्ष्य केले.

दरम्यान महिला सुरक्षिततेकरीता शक्ती कायदा लवकरच अंमलात आणण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगताना कायदा व्यवस्था, प्रशासन व समाज यांनी समन्वयाने काम करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करताना केंद्र सरकारने विकृत दृश्यांसह वेब सिरीज व पोर्नोग्राफी बंद करून समाजाला दिशा देण्याची गरजही व्यक्त केली.

यावेळी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, उपसरपंच विजयराज दरेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सुवर्णा रामदास दरेकर, शशिकला सातपुते, रुपाली दरेकर, संगीता हरगुडे, स्नेहल भुजबळ, नवनाथ हरगुडे, माजी सरपंच गीता भुजबळ, सुनीता दरेकर, दत्तात्रय हरगुडे आदी उपस्थित होते.

loading image
go to top