Ganpati Visarjan 2023 : विसर्जन मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त; ९००० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी शहर पोलिस दलाकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Pune Ganpati Visarjan
Pune Ganpati VisarjanSakal

पुणे - गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी शहर पोलिस दलाकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी सुमारे नऊ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी असतील. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त ए. राजा, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे या वेळी उपस्थित होते.

गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिक लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, शहरात तीन हजार ८६५ सार्वजनिक गणेश मंडळ आणि सहा लाख १४ हजार २५७ घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २८) विसर्जन मिरवणुकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने शहर पोलिस दलाकडून नियोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत दोन हजार ९०५ सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होतील. गणेश मंडळ, ढोल ताशा पथके आणि संबंधित सरकारी यंत्रणांसमवेत बैठका घेण्यात आल्या. गणेश मंडळांकडून सकारात्मक सहकार्य मिळत आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १३ हजार सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिस बंदोबस्तासाठी बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि शीघ्र कृती दलाच्या (क्यूआरटी) तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

वाहतूक मार्गात बदल

गणेशोत्सव कालावधीत वाहतुकीस अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना वाहनांच्या पार्किंगसाठी २६ ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे पोलिस उपायुक्त मगर यांनी सांगितले.

असा राहील पोलिस बंदोबस्त...

  • पोलिस आयुक्त- १

  • पोलिस सहआयुक्त- १

  • अतिरिक्त पोलिस आयुक्त- ४

  • पोलिस उपायुक्त १०

  • पोलिस निरीक्षक १५५

  • सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक ५७८

  • पोलिस कर्मचारी ६ हजार ८२७

  • होमगार्ड ९५०

  • राज्य राखीव पोलिस बल तुकडी - २

- नागरिकांच्या सोयीसाठी मुख्य मिरवणूक मार्गांवर एलईडी स्क्रीन

- अनुचित घटना घडू नये यासाठी गोपनीय यंत्रणा अलर्ट

- सोनसाखळी चोरी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलिस पथके तैनात

- लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ४० पोलिस मदत केंद्र

- आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित

- संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर २०५ सीसीटीव्ही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com