कचरा उचलणार आता ‘ऑन कॉल’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

तुमच्या परिसरात की गृहनिर्माण संस्थांमध्ये ई-कचरा साचलाय का? मग विचार काय करताय, पालिकेच्या सहायक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फोन करा आणि कचरा उचलण्यास सांगा. कारण, आता ‘ऑन कॉल’ या तत्त्वावर पालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून (ता. ५) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पिंपरी - तुमच्या परिसरात की गृहनिर्माण संस्थांमध्ये ई-कचरा साचलाय का? मग विचार काय करताय, पालिकेच्या सहायक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फोन करा आणि कचरा उचलण्यास सांगा. कारण, आता ‘ऑन कॉल’ या तत्त्वावर पालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून (ता. ५) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी जुलैपासून ए. जी. इन्हायरो इन्फ्रा प्रोजेक्‍टस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला शहरातील दक्षिण विभागाची जबाबदारी दिली आहे. बी. व्ही. जी. इंडिया संस्थेवर शहराच्या उत्तर भागासाठी नियुक्ती केली. या संस्थांकडून कचरा संकलित आणि ई-कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली. त्यासाठी स्वतंत्र वाहनही दिले. या दोन्ही संस्थांबरोबर पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनाही काम दिले. ‘ऑन कॉल’ या तत्त्वावर सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर नागरिकांनी कचरा उचलण्याची मागणी करायची. कचरा उचलण्यासाठी वाहने पाठविण्यात येणार आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbage collect On Call