कचरेने लेली सबकी जान...! 

कचरेने लेली सबकी जान...! 

पुणे : कचरा सुखा और गीला, सबने मिला कर डाला... कचरेने लेली सबकी जान, गौर से सुनिये मेहरबान... अशा शब्दांत गाण्याच्या माध्यमातून नागरिकांचे कचऱ्याबाबत प्रबोधन करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हे गाणे फारपूर्वी व्हायरल झाले असते, तर कदाचित पुण्यात कचऱ्याची इतकी वाईट अवस्था नसती. तरीही येत्या काळात प्लॅस्टिकबाबत जनजागृती करून जमेल तेवढा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचे ध्येय महापालिकेचे स्वच्छतेचे वारकरी महादेव जाधव यांनी व्यक्त केला आहे. 
कचरा सुखा और गीला, सबने मिला कर डाला... कचरे ने लेली सबकी जान, गौर से सुनिये मेहरबान... पुणे शहर का सारा सब्जीबाजार लेके... कॅरिबॅग हो या प्लॅस्टिकवाला इसको आदत कर डाला... ए आदतने लेली सब की जान, गौर से सुनिये मेहरबान... असे म्हणत प्लॅस्टिकबरोबरच ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याबाबत जाधव गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. 
येवलेवाडीत राहणारे जाधव महापालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी आहेत. ते सध्या पर्वती पायथा भागात काम करत आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण करणे, स्वच्छतेचे धडे देण्यासाठी ते गाणी गातात. आम्ही स्वच्छतेचे वारकरी जातील घरोघरी, असे म्हणत रस्ता झाडता झाडता ते गाणी गात जनजागृती करतात. 
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराला देशात अव्वल आणण्यासाठी ते झटत आहेत. किशोर कुमार, महंमद रफी, मन्ना डे आदी गायकांची गाणी त्यांना अधिक भावतात. त्यांना याचे बाळकडू त्यांचे वडील जीवराज जाधव आणि आई लक्ष्मी जाधव यांच्याकडून मिळाले. कारण ते दोघेही कीर्तनकार होते. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षापासूनच गाणे गाण्याची त्यांना आवड होती. शिक्षण चौथी पास असले तरीही अनेक हिंदी जुन्या गाण्यांमध्ये ते अगदी चपखल बसतील असे शब्द बसून विडंबन गीत सादर करतात; मात्र या गीतातून कोणावर टीका न करता प्रबोधन करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. कचऱ्यासंदर्भात असलेल्या विविध कार्यशाळा, शिबिर, प्रशिक्षण वर्गात ते आवर्जून सहभागी होतात. त्यातील शब्द अतिशय बारकाईने ऐकतात तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधले आणि इतर ठिकाणचे शब्द बारकाईने ऐकून त्यांची सांगड घालत ते गाणी लिहितात. 

कलापथकाद्वारे जनजागृतीचा मानस 
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी त्यांना जनजागृतीच्या कामासंदर्भात प्रोत्साहित केले असून, प्रशासनाने अधिक सहकार्य केल्यास एक कलापथक तयार करून दररोज सकाळी आपले काम झाल्यानंतर दुपारच्या वेळेत विविध ठिकाणी जाऊन कचऱ्यासंदर्भात जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com