नदीपात्रात गाळाऐवजी कचराच अधिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पुणे - मुठा नदीपात्रातून गाळ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर टायर, संगणक प्रिंटर, गोधड्या, कपडे इत्यादी कचरा बाहेर आला आहे. ओंकारेश्‍वर मंदिराजवळ महापालिकेने ‘स्पायडर’ मशिनचा उपयोग करून गाळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु गाळाऐवजी नदीत कचराच अधिक असल्याचे उघड झाले. 

गणेशोत्सवात महापालिका प्रशासन स्वच्छतेच्या कामांकडे अधिक लक्ष देत आहे. आयुक्त सौरभ राव आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुठा नदीकाठी असलेल्या विसर्जन घाटाची पाहणी केली होती. त्या वेळी नदीपात्रात गाळ साठल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार आयुक्तांनी नदीतील गाळ काढून खोली वाढविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. नदीपात्रात ‘जेसीबी’ उतरविता येत नाही. त्यामुळे एका ठेकेदाराकडील ‘स्पायडर’ मशिनच्या साह्याने हा गाळ काढण्यास बुधवारी सुरवात करण्यात आली. 

Web Title: garbage is more than the mud in the river