बोपदेव घाट रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

प्रशासनाचे दुर्लक्ष; कचरा साफ करण्याची नागरिकांची मागणी
Katraj garbage
Katraj garbageSakal
Updated on

कात्रज : बोपदेव घाट रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. ज्या निसर्गरम्य बोपदेव घाटातून सासवडकडे जाण्याचा मार्ग आहे. तो मार्ग आता बेजबाबदार नागरिकांमुळे कचराकुंडी बनला आहे. बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक ४१(कोंढवा येवलेवाडी)च्या हद्दीत हा रस्ता येतो. घाटालगतच्या रस्त्यांवर रात्रीच्यावेळी हा कचरा टाकला जातो. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग लागल्याचे दिसत आहे. रात्रीच्यावेळी नागरिक कचरा टाकत असल्याने हा कचरा कोण टाकत आहे हे लक्षात येत नसून महापालिकेकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Katraj garbage
मृत्युंजय दुतांकडून अपघातग्रस्तांना मिळतेय वेळेवर मदत

शहरालगतची हॉटेल आणि घरांमधील कचरा, ई-कचरा बांधकामाचा राडारोडा आणि थर्माकॉलसारखा औद्योगिक कचराही मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या बाजूला पडल्याचे दिसत आहे. टाकावू पदार्थांमुळे हा कचरा डुकरे आणि कुत्रे रस्त्यांवर आणतात, त्यामुळे दुर्गंधीत वाढ झाली आहे. तसेच घाटातून खाली येताना उतार असल्याने कचरा रस्त्यांवर आल्यास अपघात घडल्याच्याही घटना घडल्या आहेत. सकाळी मॉर्निंग वॉकसाठीही या रस्त्यांवर लोक जातात, त्यांनाही याचा त्रास होतो. त्यामुळे घाट रस्ता स्वच्छ करुन दुर्गंधीमुक्त करण्याची गरज असून याबाबत प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.

Katraj garbage
सर्वार्थाने पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे : आशा भोसले

या परिसरात रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यात येत असल्याने कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून रात्रपाळीवर गस्तीसाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने गस्तीसाठी जायला कोणी तयार होत नाही. याबाबत पोलिसातही तक्रार दिली असल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाने दिली आहे.

Katraj garbage
ज्येष्ठ तमाशा कलावंतावर मायेची पाखरण

याबाबत सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु, घाट रस्त्यांवरील कचराप्रश्नी प्रशासन पूर्णपणे उदासीन आहे. हा कचरा साफ करण्याची गरज आहे. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे प्रशासनाने कचरा टाकणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी - संदीप बधे, स्थानिक

या रस्त्यांवरील कचरा सातत्याने साफ करण्यात येतो. परंतु, २३ गावांच्या समावेशानंतर सफाई कामगार कमी पडत आहेत. त्यामुळे कचरा उचलण्यास विलंब होत आहे. - विकास मोरे, आरोग्य निरीक्षक, कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com