Garje Marathi Summit : ‘गर्जे मराठी’ समिट ऑगस्टमध्ये अमेरिकेत ; परदेशस्थ मराठी विद्वतजनांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ

गर्जे मराठी ग्लोबल एक्सलंट समिट २०२४ यंदा अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात आयोजित करण्यात आली आहे.
Garje Marathi Summit
Garje Marathi Summitsakal

पुणे : गर्जे मराठी ग्लोबल एक्सलंट समिट २०२४ यंदा अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात आयोजित करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तीन व चार तारखेला पार पडणाऱ्या या परिषदेसाठी प्राज इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परदेशस्थ मराठी विद्वतजनांसाठी ‘गर्जे मराठी’ आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे.

परिषदेचे हे दुसरे वर्ष असून, जगभरातील १५०० हून अधिक मराठी उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, मार्गदर्शक या परिषदेत सहभागी होणार आहेत. न्यू जर्सी एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही परिषद पार पडणार आहे. यात जगभरात वेगाने विस्तारणाऱ्या उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ज्यामध्ये जैवतंत्रज्ञानापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत विविध विषयांवर संवाद साधला जाईल.

तसेच चर्चासत्रे आणि कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले आहे. जैवतंत्रज्ञानावर अमर उऱ्हेकर, कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात डॉ. अजित जावकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच रूपाली देशपांडे, वैशाली कुलकर्णी, जय कुलकर्णी, राजीव थोरात, मिलिंद कानिटकर, डॉ. सुचेता पवार, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, सायबर सुरक्षातज्ज्ञ उपेंद्र मर्डिकर, आनंद गाणू, आनंद जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड, राहुल पुराणिक, डॉ. संजय भंडारी आदी उपस्थितांशी संवाद साधतील.

विशेष म्हणजे जगभरातील मराठीजनांना समाजसेवक डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांचे विचारही ऐकायला मिळणार आहेत. जुलै २०२३ मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरात ही परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले होते. यंदाच्या परिषदेत सहभागासाठी ‘गर्जे मराठी’च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com