पुण्यात 300 किलोंचा हार मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात जाण्यापूर्वीच अडकला...

garland
garland

पुणे : महाजनादेश घेण्यासाठी मुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले, तसे त्यांच्या स्वागतासाठी माननीयही सरसावले. आपली छाप मुख्यमंत्र्यांवर पडावी म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्याही केल्या. कुणी फ्लेक्सबाजी, कुणी फुलांची उधळण तर कुणी हार.. पण सिंहगड रस्त्यावरील एका माननीयांनी तब्बल 310 किलोचा हार मुख्यमंत्र्यांसाठी केला. पण मुख्यमंत्र्यांच्या गळयात जाण्याआधी तो सुरक्षा तपासणीच्या फेऱ्यात अडकला... सिंहगड रस्त्यावरील महाजनादेश यात्रेच्या चर्चेसोबतच या हाराची आणि त्याच्या झालेल्या तपासणीची चर्चाही इथं दिवसभर रंगली होती. 

त्याचं झालं असं..... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राजाराम पुल चौक येथे येणार होती. त्यांच्या स्वागतासाठी प्रभाग 34 चे नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्या वतीने भाजपच्या रंगात झेंडूच्या फुले आणि पाने यांचा हार तयार करण्यात आला. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कडून हाराची संपूर्ण तपासणी करण्यात आली.

दोनशे ऐंशी किलो झेंडू आणि तीस किलो पाने असा तीनशे दहा किलो फुलांचा हार तयार करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्र्यांना हार तसेच पगडी आणि चांदीची कलाकुसर असणारी तलवार भेट देण्यात आली याचे आयोजन नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्या वतीने करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com