Video : कोरोना असेपर्यंत महिना 10 हजार बोनस द्या; गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांची मागणी

Video : कोरोना असेपर्यंत महिना 10 हजार बोनस द्या; गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांची मागणी

पुणे : कोरोना व्हायरस संकट काळात अत्यावश्यक सेवा म्हणून गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये मृत्यूविमा कवच आणि 5 लाख रुपये आरोग्य विमा कवच तसेच कोरोना असेपर्यंत महिना 10 हजार रुपये बोनस द्या. याशिवाय रेड झोन शहरातील गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करावी, अशी मागणी गॅस कर्मचारी संघटना करत आहे.

देशामध्येही कोव्हिड 19 (कोरोना) या महामारीने थैमान घातले आहे. देशातील सर्वच राज्यात हा विषाणू आनेक मार्गाने पोहचला आहे. विषाणूच्या काळात देखील लोकांना घरपोच गॅस सिलेंडर देत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना कोरोना संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे, एकतर ते असंघटित कामगार असून त्यांचे हातावरचे पोट आहे. त्यांना सुद्धा जीव आहे आणि त्यांना सर्व सुरक्षित उपाय देऊन गॅस सिलेंडर वितरित करण्यासाठी साधनसामग्री मिळावी, कारण त्यांना कोणालाही कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना लागण होण्याची दाट शक्यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे कर्मचारी घरोघरी जाऊन गॅस सिलेंडर वितरित करण्याचे काम करत असतात. तसेच या असंघटीत कामगारांचा कसल्याही प्रकारचा विमा किंवा आरोग्य विमा नसतो, असे कामगार नेते संदीप लहाने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com