...म्हणून बारामतीत लवकरच गॅसदाहिनी कार्यान्वित करण्यात येणार

death1.jpg
death1.jpg

बारामती (पुणे) : कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्यापासूनच बारामती नगरपालिकेचे कोरोना योध्दे अविरतपणे कार्यरत आहेत. या काळातील सर्वाधिक संवेदनशील म्हणजे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम या योध्दयांनी दिवस रात्र न पाहता कौटुंबिक रोष ओढवून घेत केलेले आहे. ही तीव्रता वाढू लागल्यानंतर आता बारामतीतील गॅसदाहिनी कार्यान्वित करण्याचा निर्णय मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी घेतला आहे. 

शहरातील अमरधाम स्मशानभूमीमध्ये तयार करण्यात आलेल्या गॅसदाहिनीचे मध्यंतरी आलेल्या महापूरामध्ये कमालीचे नुकसान झाले होते. आता सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करुन नगरपालिकेने तातडीने हे काम मार्गी लावण्यासाठी पावले उचलली आहेत. नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी आतापर्यंत 80 मृतदेहांवर गेल्या काही दिवसात अंत्यसंस्कार केलेले आहेत. जळोची स्मशानभूमीमध्ये असलेल्या तीन बेडसवर लाकडे रचून पीपीई किट परिधान करुन अंत्यसंस्कार करणारे कर्मचारीही या रोजच्या कामाने आता थकून गेले आहेत. त्यांच्या मानसिकतेवरही हळुहळू या कामाचा परिणाम होत आहे. ज्यांची ओळखही नाही अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना या सर्वच कर्मचा-यांनी आपली संवेदनशीलता कायम ठेवत आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती असल्याप्रमाणे अत्यंत सन्मानाने सर्व सोपस्कार पार पाडले. 

या सर्व प्रक्रीयेमध्ये लागणारा वेळ, कुटुंबियांनाही होणारा मनस्ताप तसेच लाकडांसह इतर साहित्याची उपलब्धता याचा विचार करुन आता गॅसदाहिनी कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवड्यात ही प्रक्रीया पूर्ण होईल, अशी माहिती किरणराज यादव यांनी दिली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असे होईल गॅसदाहिनीचे काम....
या गॅसदाहिनीमध्ये एका वेळेस कमर्शियल स्वरुपातील 24 सिलिंडर्स लागतात. तीन ते चार मिनिटात गॅसदाहिनी कार्यान्वित होते व तीन मिनिटात अंत्यसंस्कार होतात. राज्यातील काही नगरपालिकांमध्ये गॅसदाहिनीचे कामकाज उत्तम सुरु आहे. जेथे अंत्यसंस्काराची संख्या मोठी असते अशा मोठ्या शहरात साधारणपणे विद्युतदाहिनी वापरतात पण जेथे अंत्यसंस्कारांची संख्या कमी आहे तेथे गॅसदाहिनी वापरली जाते, तिचा खर्च तुलनेने कमी असतो. एकाच वेळेस 24 सिलिंडर्सच्या प्रेशरने गॅसदाहिनी प्रज्वलित होते व काही मिनिटात मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. एकदा 24 सिलिंडर्स लावल्यानंतर साधारणपणे 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com