बारामती शहर : येथील एमआयडीसीतील ग्रीन पार्कनजिक असलेल्या एका मेसमधील गॅस सिलिंडरचा आज सकाळी स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज सकाळी दहाच्या सुमारास या मेसमधील सिलिंडरला अचानकच आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित सर्व लोक बाहेर पळाले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. काही क्षणातच या सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरुन गेला होता. सिलिंडरला आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
दरम्यान, बारामती एमआयडीसी तसेच नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या वेगाने घटनास्थळी गेल्याने स्फोटानंतरची आग काही मिनिटातच आटोक्यात आली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, येथे दुसराही सिलिंडर होता मात्र सुदैवाने त्याला काहीही झाले नाही. या मेसच्या शेजारीच कडबा रचून ठेवला होता, मात्र त्याचेही फारसे नुकसान आगीने झाले नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.