पुणे : डहाणूकर कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीत गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना डहाणूकर कॉलनीतील गल्ली क्रमांक सहामधील प्रियांजली बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (ता.२०) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे : कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीत गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना डहाणूकर कॉलनीतील गल्ली क्रमांक सहामधील प्रियांजली बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (ता.२०) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले.

प्रियांजली बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील बंद फ्लॅटमध्ये ही घटना घडली असून, त्या फ्लॅटच्या वरच्या बाजूस राहत असलेले दोघे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे अग्निशमन अधिकारी गजानन पात्रूडकर यांनी सांगितले. दरम्यान, मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas cylinder explodes in Dahanukar colony Pune Two injured

टॅग्स