किरकटवाडी, खडकवासल्यात गॅसपुरवठा विस्कळित

किरकटवाडी - घरपोच गॅस सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांना एजन्सीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे.
किरकटवाडी - घरपोच गॅस सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांना एजन्सीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे.

किरकटवाडी - किरकटवाडी व खडकवासला भागात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना ग्राहकांना घरगुती गॅस घरपोच देणे नियमाने बंधनकारक आहे; परंतु पुरवठा अपुरा असल्याने मागणी असलेल्या ग्राहकांना घरपोच गॅस मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांना काम सोडून गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर रांगेत उभे राहून गॅस घ्यावा लागत आहे. सीडब्ल्यूपीआरएस वर्कर्स असोसिएशनच्या माध्यमातून खडकवासला येथे भारत गॅस एजन्सी चालवली जाते. सर्वांत जुनी एजन्सी असल्याने या एजन्सीवर ग्राहकांचाही मोठा ताण आहे. दररोज सरासरी ४०० ते ५०० सिलिंडरची मागणी असताना प्रत्यक्षात मात्र येथे ३०० सिलिंडरची आवक होत आहे. त्यामुळे शंभर ते दीडशे ग्राहकांना गॅस मिळत नाही. गॅस मिळावा म्हणून लोक घरपोच सिलिंडरची वाट न पाहता सकाळीच गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर नंबर लावून थांबत आहेत. कंपनीकडूनच अपुरा गॅस पुरवठा होत असल्याने आपल्यालाही गरजेएवढे सिलिंडर मिळत नाहीत व ग्राहकांना वेळेत सेवा देण्यात अडचणी येत आहेत, असे गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कोल्हेवाडीतील नागरिक राजेश विरुळकर म्हणाले, ‘गॅस सिलिंडरची नोंदणी केली आहे; परंतु रेफरन्स नंबर येत नाही, त्यामुळे गॅस घेण्यासाठी एजन्सीच्या कार्यालयामध्ये जावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com