बारामतीतील गॅसदाहिनी अखेर सुरू; अमरधाम स्मशानभूमीत प्रथमच कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार 

baramati 12.jpg
baramati 12.jpg

बारामती (पुणे) : शहरातील गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली गॅसदाहिनी अमरधाम स्मशानभूमीमध्ये आजपासून अखेर कार्यान्वित झाली. या दाहिनीत प्रथमच एका कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही गॅसदाहिनी सुरू करण्याबाबत "सकाळ'ने पाठपुरावा केला होता. पर्यावरणपूरक व कमी वेळेत अंत्यसंस्कार हे गॅसदाहिनीचे वैशिष्ट्य आहे. पहिल्या टप्प्यात फक्त कोरोनाग्रस्त मृतदेहांवरच या गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करणार असल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले. 

कोरोनामुळे एकट्या बारामतीत आजपर्यंत 174 मृत्यू झाले असून, यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा 78 इतका आहे. या सर्व मृतदेहांवर बारामती नगरपालिकेच्या कोरोना योद्‌ध्यांनीच अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारामुळे कर्मचाऱ्यांना होणारा मनस्ताप, वाया जाणारा वेळ, साधनसामग्रीची जमवाजमव तसेच संपूर्ण अंत्यविधी होईपर्यंत मृतदेहाजवळ थांबून राहावे लागणे. या सारख्या प्रकारांनी कर्मचारीही वैफल्यग्रस्त झाले होते. हे सर्व आता थांबणार आहे. ही बाब विचारात घेत यादव यांनी गॅसदाहिनी कार्यान्वित करण्यास चालना दिली. 

गॅसदाहिनीचे वैशिष्ट्ये 
1. चार मिनिटात प्रज्वलित होते. 
2. अवघ्या तीन मिनिटात मृतदेहावर अंत्यसंस्कार. 
3. 24 सिलिंडर्सच्या मदतीने ही गॅसदाहिनी प्रज्वलित. 
4. एका अंत्यसंस्कारासाठी दोन सिलिंडर्सची गरज 
5. 24 सिलिंडर्समुळे 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार. 



गॅसदाहिनीचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कारासाठी गॅसदाहिनीची अत्यंत गरज होती. मध्यंतरीच्या पुरामध्ये दाहिनीचे बरेच नुकसान झाले होते. प्रशासनाने पाठपुरावा करून ही दाहिनी कार्यान्वित केली आहे. 
- किरणराज यादव, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळ्यात अनेकदा सरपणाचा प्रश्न निर्माण होत होता. गॅसदाहिनीमुळे पर्यावरणपूरकता जपली जाईल, याचा फायदा सर्वांनाच होईल. 
- सचिन सातव, गटनेते, बारामती नगरपरिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com