गोलांडवाडी चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

संतोष आटोळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : साबळेवाडी  (ता.बारामती) अंतर्गत येणाऱ्या गोलांडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी सर्व उपस्थितीतांची मने जिंकली. यावेळी उपस्थितांनी तब्बल बारा हजार रुपयांची रोख बक्षिसे देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. 

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पुजनाने झाली. त्यानंतर शाळेतील  इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध समाज प्रबोधनासह कोळीवाड्याची शान मला, आमदार व्हायचं, पिंगा ग पोरी पिंगा, उगवली शुक्राची चांदणी अशी बहारदार गाणी बालकलाकारांनी सादर केली या प्रत्त्येक गाण्यास उपस्थित पालक, ग्रामस्थ यांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्याचबरोबर रोख बक्षीसांचा वर्षाव करुन बारा हजार रुपयांची रोख रक्कम शाळेस सुपूर्द केली. 

यावेळी साबळेवाडीच्या सरपंच भारती अशोक भगत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद गोलांडे, माजी सरपंच सतीश गोलांडे , विजय गोलांडे, प्रविण गोलांडे, शारदा गोलांडे,  विश्वास आटोळे यांच्यासह पंचक्रोशीतील शिक्षक, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक रेवननाथ सर्जे व प्रमिला साळुंके यांनी केले.

Web Title: gathering of primary school from golandwadi