बुद्ध ही मनाची सर्वोच्च अवस्था - सरश्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पुणे - ‘‘गौतम किंवा सिद्धार्थ हे शरीराचे नाव आहे; बुद्ध हे मनुष्य शरीराचे नाव नसून ती माणसाच्या मनाची सर्वोच्च अवस्था आहे,’’ असे प्रतिपादन सरश्रींनी आपल्या प्रवचनात केले. तेजज्ञान फाउंडेशनच्या मनन आश्रमात नुकत्याच आयोजित केलेल्या ‘बोझ नहीं बोध के फॅन बनो ः अज्ञात की रुहानी हवा’ या प्रवचनात सरश्री बोलत होते. या प्रसंगी ‘भगवान बुद्ध ः जीवन चरित्र आणि निर्वाण अवस्था’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ’ने केले आहे.  

‘भौतिक सुखसाधनांची रेलचेल असूनही माणूस शांत नाही; संघर्ष, भय, असुरक्षितता आदी डोक्‍यावरच्या ओझ्यांचा त्याग करून, जगण्याला साक्षी भावाने सामोरे जाणे आवश्‍यक आहे. तरच आपले मन आश्‍वस्त होईल, आत्मिक बळ वाढविता येईल. ज्ञानाच्या प्रदेशात प्रवेश करता येणार नाही तोपर्यंत आत्मबोधही होणार नाही,’ असे सरश्रींनी सांगितले. जीवनाचा सखोल अर्थ समजून घेऊन जगणे, महत्त्वाचे आहे. त्यातूनच बोधापर्यंत पोचण्याचा मार्ग मिळू शकेल,’ असेही सरश्रींनी सांगितले. तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्‍वस्त तेजविद्याजी यांनी प्रास्ताविक केले.

पुस्तक सर्वत्र उपलब्ध
‘भगवान बुद्ध : जीवन चरित्र आणि निर्वाण अवस्था’ हे पुस्तक (किंमत १५० रुपये) ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये आणि महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.   www.sakalpublications.com तसेच amazon.co.in येथेही हे पुस्तक उपलब्ध आहे. 
अधिक माहितीसाठी ८८८८८४९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: gautam buddha sarshri book publish