भीमा-कोरेगाव प्रकरण : गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पुणे : एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी मंगळवारी येथील विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवलाखा यांच्या अंतरिम सुरक्षेचा अवधी हा चार आठवड्यांपर्यंत वाढवून दिला होता. तर अटकपूर्व जामिनासाठी संबंधित न्यायालयासमोर जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने त्यांनी हा अर्ज केला आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप गौतम नवलाखा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिका नवलाखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या निकालास नवलाखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam Navlakha Filed application for pre arrest bail