
Navale Bridge Accident Case: नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वाहनाचा काही दिवसांपूर्वी पुण्यात अपघात झाला होता. एका उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमीच्या गाडीने धडक दिली. मात्र या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. प्रत्यक्षात गौतमी पाटील गाडीमध्ये होती की नाही? याबाबतही संभ्रम होता. पुणे पोलिसांच्या तपासामधून आता वस्तुस्थिती समोर आली आहे.