

Leopard Trapped in Cage at Gavarewadi
Sakal
घोडेगाव : घोडेगाव पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावरवाडी ( ता आंबेगाव)येथे लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आठ वर्षांची मादी बिबट जेरबंद झाली.गुरुवारी दुपारी या परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेऊन वनविभागाने पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे शेतकरी अभिजित पोखरकर आणि उद्धव पोखरकर गाई राणात सोडण्यासाठी गेले असता त्यांनी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला पाहिला. त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला.वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला माणिकडोह वन्यजीव निवारा केंद्र जुन्नर येथे हलवले. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वनतारा, गुजरात येथे त्या बिबट्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिंबकर यांनी दिली.मानववस्तीच्या परिसरात बिबट्याच्या हालचालीमुळे निर्माण झालेली भीती आता काहीशी कमी झाली आहे.