Pune News : आळंदीमध्ये होणार ‘गीता भक्ती अमृत महोत्सव’

गीता परिवार ट्रस्टतर्फे पुण्याजवळील आळंदी येथे ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आठ दिवसीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संमेलन ‘गीता भक्ती अमृत महोत्सव २०२४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
shri govind dev giri maharaj
shri govind dev giri maharajsakal

पुणे - गीता परिवार ट्रस्टतर्फे पुण्याजवळील आळंदी येथे ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आठ दिवसीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संमेलन ‘गीता भक्ती अमृत महोत्सव २०२४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोशाध्यक्ष व अध्यात्मिक नेते स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त होणार आहे.

या महोत्सवात संत ज्ञानेश्वर संस्थान आळंदी, गजानन महाराज संस्थान आळंदी, श्री भैरवनाथ ग्रामदेवता ट्रस्ट आळंदी, गाथा मंदिर देहू व श्री नरसिंह सरस्वती ट्रस्ट आळंदी यांचा सहभाग आहे. गीता भक्ती अमृत महोत्सवात योगऋषी स्वामी रामदेव, योगी आदित्यनाथ, श्री श्री रविशंकर, साध्वी ऋतंभरा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आचार्य बाळकृष्ण आदी सहभागी होणार आहेत.

स्वामी श्री गोविंददेव गिरी म्हणाले, ‘‘गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा करताना मला खूप आनंद होत आहे. या सोहळ्यात अध्यात्म, संस्कृती आणि परंपरेचे एक केंद्रीकरण पाहणे हा एक नितांत आनंद आहे. हा कार्यक्रम सर्व लोकांना आपल्या मूळ संस्कृतीची ओळख करून देईल व तिच्याशी नातं अधिक घट्ट करेल.’’

सुमारे २ हजार वैदिकांतर्फे ८१ कुंडांचा महायाग, ११ हजार विद्यार्थ्यांद्वारे भगवद्गीता आणि वेदांचे पठण, २५० हून अधिक कलाकारांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम, अशा प्रकारच्या वैदिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचा समावेश या महोत्सवात असेल. भव्य शोभा यात्रा देखील या प्रसंगी होईल.

जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोकांना एका आध्यात्मिक छताखाली एकत्र आणणारा गीता भक्ती अमृत महोत्सव आहे. हा उत्सव एखाद्या संताची उपासना करण्याचा प्रसंग नाही. तर, भारताची दैवी संत परंपरा असून आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अथक योगदान देणाऱ्या ७५ उत्कृष्ट आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचा सन्मान या उत्सवात होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com