‘गीता’ ग्रंथ मार्गदर्शक - तिवारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

पुणे - ‘गीतेतील कर्मयोग आणि काही ना काही कर्म करीत राहा, निष्क्रिय राहू नका, त्याचे फळ मिळतेच हा संदेश तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे. युवा पिढीला चारित्र्यसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे, हीच ‘आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य’ या ग्रंथलेखनामागील प्रेरणा आहे’’, असे लेखक अरुण तिवारी यांनी नमूद केले.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सहलेखक म्हणून ३० वर्षे कार्यरत असलेले तिवारी यांनी ‘गीतारहस्य’ या लोकमान्य टिळक लिखित भगवद्‌गीतेवरील टीकाग्रंथाचे आधुनिक अर्थान्तरण ‘अ मॉडर्न इंटरप्रिटिशन ऑफ लोकमान्य तिलक्स गीतारहस्य’ या नावाने इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकाचा सुदर्शन आठवले यांनी केलेला ‘आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य’ हा ‘सकाळ प्रकाशना’ने प्रसिद्ध केलेला मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचे प्रकाशन महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते झाले. या वेळी तिवारी बोलत होते. महंत स्वामी महाराज यांनी भगवद्‌गीता, गीतारहस्य अशा ग्रंथांचे पठण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. 

सर्वच वयोगटातील वाचकांना चिंतनप्रेरणा देणाऱ्या या ग्रंथाची किंमत ५०० रुपये असून ‘सकाळ प्रकाशना’च्या वाचक महोत्सवानिमित्त हा ग्रंथ ३७५ रुपये या सवलत मूल्यात सकाळ मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये आणि पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीसाठी  www.sakalpublications.com /amazon.in येथे लॉग इन करावे व अधिक माहितीसाठी ८८८८८४९०५० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Geeta Book Arun Tiwari