योगगुरु डाॅ. गीता अय्यंगार यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांच्या ज्येष्ठ कन्या आणि रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्सिट्युट या संस्थेच्या संचालिका योगगुरू डाॅ. गीता अय्यंगार यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. 

पुणे : योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांच्या ज्येष्ठ कन्या आणि रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्सिट्युट या संस्थेच्या संचालिका योगगुरू डाॅ. गीता अय्यंगार यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. 

ह्रदयाच्या स्नायुंमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे बंधु प्रशांत अय्यंगार आणि चार बहिणी असा परिवार आहे. वयाच्या अकराच्या वर्षी त्यांनी योगसाधनेला सुरुवात केली. आयुर्वेद आणि  योग यांवर त्यांचा गाढा अभ्यास होता.

योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या योग शिबिरात कालपर्यंत त्या 56 देशामधून आलेल्या योग साधकांना प्रशिक्षण देत होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आज दुपारी तीन वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Web Title: geeta iyengar passed away

टॅग्स