करदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे : "प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेऊन लेखा परीक्षण करावे आणि त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा; कारण तेच आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत'', असे मत दिल्ली येथील मुख्य प्राप्तिकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी व्यक्त केले. 

बिबवेवाडीतील द इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंट्‌स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) भवनात झालेल्या "प्राप्तिकरातील तरतुदी' या विषयावरील एकदिवसीय शिबिरामध्ये ते बोलत होते. ""करदाते, लेखापाल आणि कर विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून चांगले वातावरण ठेवले पाहिजे. सेवाभावी संस्थानी कर भरताना तरतुदी समजून घेऊन खर्चाचा ताळेबंद करावा,'' असा सल्ला गुप्ता यांनी दिला. या शिबिराला शहरातील प्राप्तिकर विभागाचे आयुक्त एस. एन. मीना, अतिरिक्त आयुक्त संदीप साळुंखे, सीए शशांक पत्की, "आयसीएआय'च्या उपाध्यक्षा ऋता चितळे आदी उपस्थित होते. सुमारे दोनशे लेखापाल या शिबिरात सहभागी झाले होते. चितळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर, अभिषेक धामणे यांनी आभार मानले. 
 
Web Title: to get justice to Taxpayers should work together says Gupta