अंबामाता मंदिर चौकाला अतिक्रमणांचा विळखा | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबामाता मंदिर चौकाला अतिक्रमणांचा विळखा

कात्रज : अंबामाता मंदिर चौकाला अतिक्रमणांचा विळखा

कात्रज : अंबामाता मंदिर चौकाला अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. भाजीपाला स्टॉल, नाष्ट्याचे स्टॉल, फळवाल्यांचे स्टॉल आणि चुकीच्या पद्धतीने केलेली वाहनांची पार्किंग यामुळे रस्ता अरुंद बनला असून वाहनाचालकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यांवर पी-१ आणि पी-२ म्हणजेच सम-विषम तारखेला पार्किंग करण्याचे नियम आहेत. परंतु या नियमालाही फाटा दिला गेला असल्याचे दिसून येत आहे.

वाहनचालकांसोबत नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. महापालिका प्रशासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिक सांगतात. तसेच, पार्किंगच्या नियमनांचे कुठलेही पालन होत नसताना वाहतूक पोलिस प्रशासनाकडूनही कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. तसेच रिक्षाचालकही या परिसरात विचित्र पद्धतीने रिक्षा उभ्या करत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: प्राण गेले तरी, आता माघार नाही : तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन

"पाठीमागे एकवेळेस या चौकात बस घुसली होती. त्यावेळी मोठी दुर्घटना टळली होती. त्या रस्त्यांवरून चालणेही अवघड आहे. याठिकाणी असलेले पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी आहेत की, स्टॉल लावण्यासाठी हा प्रश्न पडतो."

- श्रीराम कुलकर्णी, स्थानिक नागरिक

"अंबामातामंदिर चौक आणि परिसरातील परिस्थिती पाहून त्या ठिकाणी अतिक्रमाणाची कारवाई करण्यात येईल. त्याठिकाणी हातगाडीवाल्यांपासून वाहतूकीला अडथळा होत असेल तर तशा सूचना करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील."

- शाम अवघडे, क्षेत्रिय अतिक्रमण निरिक्षक

loading image
go to top