चोवीस तास पाण्याच्या कर्जरोखेसाठी गती मिळेना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे उभारण्यासाठी "एसबीआय कॅपिटल' या मर्चंट बॅंकरची नेमणूक करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली मात्र; कर्जरोखे उभारण्याच्या प्रस्तावाला मात्र गती मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुणे - चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे उभारण्यासाठी "एसबीआय कॅपिटल' या मर्चंट बॅंकरची नेमणूक करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली मात्र; कर्जरोखे उभारण्याच्या प्रस्तावाला मात्र गती मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहरात राबविण्यात येणाऱ्या चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेसाठी 3300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 2 हजार 264 कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. या संदर्भातील प्रस्तावाला यापूर्वीच सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली. योजनेच्या कामाला गती देण्यासाठी कर्जरोखे उभारण्याचा प्रस्तावही स्थायी समितीपुढे ठेवला होता. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता असताना प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. त्यामुळे कर्जरोखे उभारण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासाने पुन्हा सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. परंतु, कर्जरोखेच्या माध्यमातून योजना राबविण्यात सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने सुरवातीपासून विरोध केला. त्यानंतर कर्जरोखेसाठी "मर्चंट बॅंकर'च्या नेमणुकीला मंजुरी देत, कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव नव्या सभागृहात म्हणजे, एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मांडावा, ही उपसूचना मंजूर करण्यात आली. 

"शहरात ही योजना राबविण्यासाठी कर्जरोखे उभारण्यात येणार असून, ते उपलब्ध करून देणाऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार "एसबीआय कॅपिटल'च्या अधिकाऱ्यांशी लगेचच बैठक घेऊन कार्यवाही केली जाईल. तसेच, सर्वसाधारण सभेत पुन्हा प्रस्ताव मांडण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Get speed for twenty-four hour water bonds