माणूसकी निभावल्याबद्दल पुरस्कार मिळत असेल, तर अभिमानाची नव्हे, खेदाची बाब : सोनम वांगचुक

pune.jpg
pune.jpg

पुणे : "माणसाला माणूसकी निभावल्याबद्दल पुरस्कार मिळत असेल, तर ती अभिमानाची नव्हे, तर खेदाची बाब आहे, असे मला वाटते." अशा शब्दात प्राईड ऑफ लडाख सोनम वांगचुक यांनी भावना व्यक्त केल्या. 

सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या १५ व्या पदवी प्रदान सोहळा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मंगळवारी संस्थेच्या लवळे कॅम्पसमध्ये होत आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित आहेत. 

यावेळी वांगचुक यांना सिंबायोसिस अभिमत विद्यापीठातर्फे डी. लिट प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात पीएच.डी. सुवर्णपदक विजेते, वैशिष्टपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. युगांडा येथील वासवा हसन या विद्यार्थ्याला उत्कृष्ट परदेशी विद्यार्थ्यासाठीचा "शां. ब. मुजुमदार पुरस्कार' देण्यात आला
.............................................................................................................................

#Post07
चित्रपटांचा आपल्या समाजावर प्रभाव असतोच.. रोज पोराला मार्कांवरून बदडणारे पालक आमीर खानचा 'थ्री इडियट्स' पाहिल्यानंतर अचानक शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रयोगांविषयी सतर्क झाले, हा त्यातलाच एक भाग. आमीरच्या 'फुन्सुख वांगडू'नं काही काळ का होईना, पण शिक्षणातील नावीन्याच्या अभावाविषयी चर्चा घडवली, हे नाकारण्यात अर्थ नाही.. 

आमीरचा 'वांगडू' ज्या वल्लीवर बेतला आहे, ते म्हणजे सोनम वांगचुक.. 'लेह ते केरळ' प्रवासादरम्यान आम्ही भेटलो या अवलियाला.. त्याच्याच कर्मभूमीत, त्यानंच निर्माण केलेल्या चमत्काराजवळ.. 

काय केलंय त्यांनी लेहमधल्या त्या शाळेत? 

वाचा यंदाचा 'शब्ददीप'

आपला 'शब्ददीप'चा दिवाळी अंक आजच बुक करा अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात...
 https://goo.gl/XwXccB
अधिक माहितीसाठी - 
व्हॉट्सअॅप : 91300 88459  
फोन : 9881598815
इमेल: webeditor@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com