पुणे जिल्ह्यातील या गावांना कोरोनाचा विळखा, एकाच घरात सात रुग्ण  

corona1
corona1

 घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे काल (ता. २) आलेल्या कोरोना रिपोर्टमध्ये दहा जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे घोडेगाव पुन्हा हॉटस्पॉट झाले आहे. तसेच, पिंपळगाव घोडे, शिनोली, काळेवाडी-  दरेकरवाडी येथेही कोरोनाचे रुग्ण सापडेल आहेत.

घोडेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे तहसील कार्यालय, न्यायालय, पोलिस ठाणे, आदिवासी प्रकल्प कार्यालयासह २० शासकीय कार्यालये आहेत. येथे काल आलेल्या कोरोना रिपोर्टमध्ये दहा जण पॉझिटिव्ह आले. त्यात ३ महिला व ७ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण गावठाणातील असल्याने ग्रामपंचायतीला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संबंधित भागात कडक अंमलबजावणी सुरु आहे. सापडलेले रुग्ण हे पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाच्या घरातील असल्याचे सरपंच क्रांती गाढवे यांनी सांगितले. घोडेगाव येथे आतापर्यंत एकूण ३१ जण कोरोनाबाधित झाले असून, 14 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

पिंपळगाव घोडे येथील सात जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. येथील ४० वर्षीय महिला जुन्नरला गेल्या होती. तेथे त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पिंपळगाव घोडे येथे आल्यानंतर त्या घरातच राहिल्या. त्यामुळे घरातील सात जण पॉझिटिव्ह झाले आहेत. शिनोली येथे एक महिला व एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. काळेवाडी-  दरेकरवाडी येथील दोन पुरुष कोरोनाबाधित झाली आहे. घोडेगाव व परिसरातील गावे येथे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com