

Attempted House Fire at Balshiram More’s house in Narodi.
Sakal
घोडेगाव : नारोडी (ता आंबेगाव ) येथील बाळशीराम सखाराम मोरे यांच्या घराला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घोडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी , बाळशीराम मोरे आपल्या कुटुंबासह पुणे येथे मुलाकडे गेले होते. घरात कोणीही व्यक्ती नसताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजा जवळ इस्तव लावून घर पेटवण्याचा प्रयत्न केला.