पुणे जिल्हयातील 'हे' पोलीस स्टेशन ठरले सर्वोत्तम

चंद्रकांत घोडेकर
Sunday, 16 August 2020

घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत इतर गावाबरोबरच आदिवासी भागातील ३० गावांचा  समावेश होतो . नागरिकांना  दिलेली चांगली वागणूक, येथील गतिशील प्रशासन व प्रशासनाचे सुयोग्य काम याचा महत्त्वाचा सहभाग आहे.

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्याला आयएसओ ९००१-२०१५ स्मार्ट पोलीसमध्ये 'ए प्लस प्लस ग्रेट' हे पुणे जिल्हयातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. 

७४ वा भारतीय स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधुन विधान भवन कौन्सिल हॉल पुणे येथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीए चे आयुक्त सुहास दिवटे, पोलीस अधिक्षक संदिप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, खेड आंबेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे आदि अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घोडेगाव पोलिस स्टेशनच्याहद्दीत इतर गावाबरोबरच आदिवासी भागातील ३० गावांचा  समावेश होतो. नागरिकांना दिलेली चांगली वागणूक, येथील गतिशील प्रशासन व प्रशासनाचे सुयोग्य काम याचा महत्त्वाचा सहभाग आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी घोडेगाव पोलीस ठाणेचा चेहरामोहरा बदललेला आहे. यामध्ये गुणवत्तापुर्ण सेवा, पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांसाठी अनुकुल बनविणे, पोलिसिंगमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, जलद प्रतिसाद, सतर्कता व जबाबदारपणा, पोलीस वर्तनात सकारात्मक बदल घडवून सामान्य जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे आदि निकषावरून सदरचे आयएसओ नामांकन देण्यात आले.

पुढील चार दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्रात बरसणार जोरदार पाऊस!​

सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, पोलीस हवालदार शंकर तळपे, दिपक काशिद, संदिप लांडे, दिलीप वाघोले, राजाराम भोगाडे, युवराज भोजणे, अलका किर्वे, मनिषा तुरे, राजेश तांबे, काशिनाथ गरुड, दत्तात्रय जढर, अमोल काळे, रेखा बोटे, मंगल शिंदे आदि पोलीस कर्मचाऱ्यांचे  यात मोठे योगदान आहे.यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

पुणे येथे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप  पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आईएसओ प्रमाणपत्र स्वीकारले. 

जन्माने पुणेकर असलेला पत्रकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निरुत्तर करून त्यांची भंबेरी उडवितो तेव्हा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghodegaon Police Station became the best police station in Pune district