

Leopard kills six goats in Pimpalgaon
sakal
घोडेगाव : शेतमजुरी करणाऱ्या चंद्रकला ज्ञानेश्वर मधे याचे अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी ताबडतोब पिंजरा लावून बिबट्या जेरबंद केला जाईल .असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिंबकर भेटीदरम्यान सांगितले. चंद्रकला मधे यांच्या घरासमोरील गोठ्यात पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दोन बिबट्यांनी प्रवेश करून शेळ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्या असून अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.