
राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या खाजगी सचिवपदी मुळशीतील घोटावडे गावाची कन्या संपदा मेहता यांची निवड झाली आहे.
भुकूम - राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या खाजगी सचिवपदी मुळशीतील घोटावडे गावाची कन्या संपदा मेहता यांची निवड झाली आहे. भारतीय वित्त विभागात प्रशासकीय सेवेत (आयएएस) दिल्ली येथे आधिकारी म्हणून काम करत आहेत.
घोटावडे गावात त्यांच्या घरण्याचा किराणा व कापड व्यावसाय होता. काळानुसार त्यांचे घराणे पुण़्यात स्थायिक झाले. वडिल सुरेश मेहता सी. ए. आहेत. संपदा दहावी व बारावीच्या परिक्षेत गुणवत्ता यादित पुणे विभागात प्रथम आल्या होत्या.
2004 साली सी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर केंद्रिय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुंबई जिल्हाधिकारी, जीएसटी विभागाच्या सहसंचालक, तसेच जळगाव, हिंगोली, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आधिकारी म्हणून काम केले. दिल्ली केंद्रिय वित्त विभागीय महसूस विभागाच्या संचालक पदावर त्या काम करत असतांना त्यांना राष्ट्रपतींचे सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे पती रणजित कुमार महाराष्ट्र केडरचे आयएएस आधिकारी आहेत. केंद्र सरकारने टाकलेला माझ्यावरील विश्वास सार्थ ठरवीन, तसेच उच्च पदावर काम करताना माझ्या तालुक्यात मला अभिमान आहे असे मेहता यांनी सांगितले.