‘गिफ्टशॉपी’ सजल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पिंपरी - ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात ‘मैत्री दिन’ साजरा करण्यासाठी अवघी तरुणाई सज्ज झाली आहे. मैत्रीचे बंध अधिक घट्ट विणण्यासाठी रंगीबेरंगी बॅंडपासून, मैत्रीचे संदेश देणाऱ्या भेटकार्ड व ताईतने शहरातील गिफ्टशॉपी गजबजल्या आहेत. किंबहुना, हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणाईनेही बाजारपेठा फुलल्या आहेत. 

येत्या पाच ऑगस्ट रोजी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा होत आहे. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या दिवसानिमित्त मुख्य बाजारपेठेपासून गल्लीतील दुकानेही ‘फ्रेंडशिप बॅंड’नी लगडले आहेत. 

त्याबरोबरच कलाकुसरीच्या भेटवस्तू, भेटकार्ड, किचेन असे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. स्मार्ट फोनच्या ॲक्‍सेसरीजपासून, सॉफ्ट टॉइजही तरुणांचे लक्ष वेधून घेत आहेत. मैत्री दिनाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुणांबरोबरच शालेय विद्यार्थीही बॅंड खरेदीसाठी सरसावले आहेत. त्यामुळे यंदा या बॅंडमध्येही असंख्य प्रकार आले आहेत. प्लॅस्टिकवर रेडियमचा वापर करून बेल्ट तयार करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या या बेल्टची किंमत पाच ते दहा रुपयांपर्यंत आहे. प्लॅस्टिकबरोबर इतरही अनेक प्रकार असून, चित्रपट कलाकारांचे छायाचित्र असलेले, गोल्डन, प्लॅटिनम बॅंडही त्यात आहेत.

केवळ बॅंडच नाही, तर अंगठी आणि ताईतही बाजारात दाखल झाले आहेत. नावीन्यपूर्ण डिझाइन भेटवस्तूंनीही तरुणाईला भुरळ घातली आहे. त्यामध्ये मित्र-मैत्रिणींचे फोटो असलेले कॉफी मग, कुशन्स, लॉकेट, फोटो फ्रेम, वॉलपीसचा समावेश असून, खास आर्टिस्टकडून ते डिझाइन करून घेण्याकडेही कल वाढत आहे. ५० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत त्याच्या किमती आहेत. 

Web Title: Gift Shops Decorated for Friendship Day

टॅग्स