हेल्मेटबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पुणे - वाहतूक नियमन करण्याऐवजी पोलिसांकडून केवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्याचे काम सुरू आहे. याला नागरिक त्रासले असून, याबाबत वाहतूक पोलिस विभागाला सूचना द्याव्यात, असे साकडे हेल्मेटविरोधी कृती समितीने पालकमंत्री गिरीश बापट यांना घातले. त्यावर आपण हेल्मेटबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्‍वासन बापट यांनी दिले.

हेल्मेटविरोधी कृती समितीचे पदाधिकारी भाजपचे संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, शिवसेनेचे श्‍याम देशपांडे, रिपब्लिकन पक्षाचे मंदार जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाली पाटील, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ९) बापट यांची विभागीय आयुक्‍त कार्यालयात भेट घेतली. दुचाकीस्वारांचे प्रबोधन करावे. पोलिसांकडून कारवाईचा अतिरेक होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. हेल्मेटची सक्ती करण्याऐवजी ते ऐच्छिक करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Web Title: Girish bapat Discussion with Chief Minister for Helmet