‘तुम्ही न्यायालयात का गेला नाहीत? - गिरीश बापट

Girish Bapat
Girish Bapat

कॅंटोन्मेंट - ‘तुम्ही न्यायालयात का गेला नाहीत? विकासाच्या कामासाठी नागरिकांच्या हिताचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्ष काय म्हणतील, याचा विचार करता कामा नये. कारण, ही कायदेशीर लढाई आहे,’’ असे खासदार गिरीश बापट यांनी बोर्डातील सदस्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत सुनावले.

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतच खासदार गिरीश बापट व आमदार सुनील कांबळे उपस्थित होते. तसेच बिग्रेडिअर कुलजित सिंह, सीईओ अमितकुमार, बोर्डाचे उपाध्यक्ष विवेक यादव, नगरसेवक अशोक पवार, प्रियांका श्रीगिरी, मंगला मंत्री, विनोद मथुरावाला, अतुल गायकवाड, रूपाली बिडकर, दिलीप गिरमकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खासदार बापट यांनी बोर्डाच्या प्रश्‍नांचा आढावा घेतला. बोर्डाच्या सदस्यांनी ‘जीएसटी’साठी बापट यांनी लक्ष घालण्याची विनंती केली. ‘वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) हिस्सा मिळत नाही, तरी बोर्डाचे सदस्य एवढे स्वस्थ का बसलेत? तुमच्या हक्काचा पैसा तुम्हाला मिळत नाही. मग तुम्ही न्यायालयात का गेला नाहीत,’ असा प्रश्‍न उपस्थित केला. बोर्डाच्या विकासासाठी खासदार निधीतून एक कोटी आणि आमदार सुनील कांबळे यांच्या निधीतून एक कोटी बोर्डाला द्यावेत, असे खासदार बापट यांनी या वेळी सांगितले. पुणे महापालिका, जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी), राज्य व केंद्र सरकार आणि सीएसआरद्वारे बोर्डाला निधी मिळविण्यासाठी बोर्डाच्या अधिकारी व सदस्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, असे गिरीश बापट यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com