वस्तीतील मुली रमल्या कलाकुसरीच्या विश्‍वात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

पुणे: त्या सर्व जणी एकत्र येऊन हस्तकलेच्या विश्‍वात रमल्या होत्या. कलाकुसरीच्या वस्तू कशा बनवायच्या हे त्यांना शिकायला मिळत होतं. एरवी वस्तीत राहताना न मिळणारा आनंद त्यांना मिळत होता. हे सारंच त्यांच्यासाठी नवं होतं अन्‌ खासही. त्यामुळेच कलाकुसरीच्या वस्तू शिकताना त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता...

निमित्त होतं निरामय संस्थेने वस्तीतल्या मुलींसाठी आयोजिलेल्या निरामय किशोरी शक्ती प्रकल्पातील "मौज - हस्तकौशल्ये' या निवासी शिबिराचं. या शिबिराचं उद्‌घाटन शुक्रवारी झालं. महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले, नगरसेविका वृषाली जाधव, ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या प्रज्ञा मानस संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. अनघा लवळेकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, निरामय संस्थेचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन आणि व्यवस्थापकीय संचालक ज्योतिकुमार कुलकर्णी उपस्थित होते. हे शिबिर रविवारपर्यंत (ता. 29) कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात चालणार आहे. या वर्षी शिबिरात संस्थेच्या 16 किशोरी वर्गातील सुमारे 375 मुलींनी सहभाग घेतला आहे. मुलींसाठी हस्तकौशल्याच्या प्रशिक्षणासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

पर्यवेक्षिका राणी थोपटे यांनी प्रास्ताविक, तर दीपा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं.

Web Title: girl and handicraft