esakal | मुलीने नष्ट केले नानासाहेब गायकवाडच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे
sakal

बोलून बातमी शोधा

nanasaheb gaikwad

मुलीने नष्ट केले नानासाहेब गायकवाडच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावकारीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले नानासाहेब गायकवाड यांच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे त्यांच्या मुलीने भाऊ आणि आईच्या मदतीने नष्ट केले आहे. तसेच काही कागदपत्रे अनोळखी ठिकाणी लपवून ठेवल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात अटकेत असलेले नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडीत आठ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?

या गुन्ह्यातील कादगदोपत्री आणि तांत्रिक पुरावा आरोपींनी निष्पन्न साथीदारांचे मदतीने लपवून ठेवला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी दांगट याने या गुन्ह्यातील बेहिशोबी मालमत्तेबाबत माहिती दिली आहे. कागदपत्रांची बॅग लपवून ठेवलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी यापूर्वी केलेल्या गायकवाडच्या घरझडतीमधून र्इएसए मॉडेल २०० एअर रायफल, ३१ जिवंत काडतुसे असलेले ३२ कॅलीबरचे दोन बॉक्स, नोटा मोजण्याचे दोन मशिन आणि नानासाहेब गायकवाड, संजीव मोरे व इतर ७० लोकांकडून घेतलेले विना सह्यांचे खरेदीखत मिळून आले आहे. तसेच पोलिसांना एक कागद मिळाला असून त्यावर १४ लोकांची नावे आहेत. नावांच्या पुढे त्यांना कर्जाने दिलेली रक्कम लिहिण्यात आली आहे. गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर र्इलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फार्इल्समधून काढून घेण्यात आले आहे. मुळ फिर्यादीतर्फे ॲड. पुष्कर दुर्गे, ॲड. सचिन झालटे, ॲड. ऋषिकेश धुमाळ यांनी कामकाज पाहिले. सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसार्इ हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

loading image
go to top