गस्तीच्या वेळी सापडलेली तरुणी आईकडे सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ असलेल्या अवसरी फाटा-गोरक्षनाथ टेकडी (ता. आंबेगाव) परिसरात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पंचवीस वर्षांची तरुणी घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. मंचर पोलिस ठाण्याच्या गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास ती आल्यानंतर तिची चौकशी केली. महिला पोलिसांना बोलावून तिला धीर दिला. शुक्रवारी पहाटे या मुलीला तिच्या आईकडे सुपूर्त केले.

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ असलेल्या अवसरी फाटा-गोरक्षनाथ टेकडी (ता. आंबेगाव) परिसरात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पंचवीस वर्षांची तरुणी घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. मंचर पोलिस ठाण्याच्या गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास ती आल्यानंतर तिची चौकशी केली. महिला पोलिसांना बोलावून तिला धीर दिला. शुक्रवारी पहाटे या मुलीला तिच्या आईकडे सुपूर्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अवसरी फाटा परिसरात मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई नीलेश खैरे हे रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना तरुणी अंधारात उभी दिसली.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग 

महिला पोलिस पूजा गारगोटे, ठाणे अंमलदार अंकलेश्वर भोसले यांनी विश्वासात घेऊन आस्थेवाईकपणे विचारणा केली. रस्ता चुकल्याने ती गोंधळलेली होती. तिला धीर देऊन पाणी पाजले.त्यानंतर या तरुणीस पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तिच्या आईला बोलावून आईकडे तिला सुपूर्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl found on patrol to mother gave by police