तरुणानेच खुणावल्यामुळे तरुणीकडून 'नजरेचे जाळे' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

अनोळखी युवतीच्या नजरेने घायाळ होऊन तिच्या एका इशाऱ्यावर फिरायला गेलेल्या तरुणावर थेऊर (ता. हवेली) येथे तीन अनोळखी तरुणांनी हल्ला केल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात लोणी काळभोर पोलिसांना तीन दिवसांत यश आले आहे.

लोणी काळभोर : अनोळखी युवतीच्या नजरेने घायाळ होऊन तिच्या एका इशाऱ्यावर फिरायला गेलेल्या तरुणावर थेऊर (ता. हवेली) येथे तीन अनोळखी तरुणांनी हल्ला केल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात लोणी काळभोर पोलिसांना तीन दिवसांत यश आले आहे. या प्रकरणात पुजा (वय 20) (बदलेले नाव) ही तरुणीच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राहूल (वय 35) (बदलेले नाव) हा मंगळवारी (ता. 20) दुपारी कामानिमित्त हडपसर गाडीतळ येथे थांबला होता. त्या वेळी पुजा ही त्याच्याकडे एकटक पाहत असल्याचे त्याला दिसले. त्यावर त्याने स्वतःचा मोबाईल नंबर लिहून कागद रस्त्यावर टाकला आणि तिला खुणावले. मात्र, ही बाब पुजा हिला खटकली. तिने तत्काळ तिचा पती राहुल यास याबाबत कळविले. त्यावर त्याने तिला त्यास थेऊर फाट्यावर घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार तिने त्यास फोन करून थेऊर फाट्याजवळच्या रेल्वे उड्डाण पुलाखाली जाऊन गप्पा मारू, असे सांगितले. त्यानुसार तो तिला घेऊन पुलाखाली आला. त्या वेळी पुलाखाली थांबलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला चढविला. 

पुजा हिला लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून, तिचा पतीने दोन मित्राच्या मदतीने हल्ला केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे. 

युवतीच्या नजेरने झाला तो अक्षरशः घायाळ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl harassment case in Pune