लग्नाची घाई आणि अल्पवयीन मुलालाच पळवून नेई

love-marriage
love-marriage

पिंपरी (पुणे) - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीने अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेले. ही घटना दिघी येथे घडली. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पायल राजकुमार भस्मे (वय १९, रा. नंदनवन हौ. सोसायटी, घरकुल, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत ४१ वर्षीय वडिलांनी दिघी पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. लग्न करुन आम्ही मोठे होऊनच परत येणार असे त्यांनी मित्रांना सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दोघांचाही तसाप सुरु असून त्यांचे लोकेशन मुंबईमध्ये असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यांना शोधण्यासाठी टिम मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, १३ मार्च रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आरोपी पायल हिने फिर्यादी यांच्या १७ वर्षीय मुलास लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com