esakal | पुणे: भारती शेवाळे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी भारती शेवाळे

पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी भारती शेवाळे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हडपसर: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी भारती युवराज शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, काका चव्हाण, नगरसेवक सचिन दोडके, जिल्हापरिषद सदस्या अनिता इंगळे, पुजा पारगे, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, माजी जिल्हापरिषद सदस्य नवनाथ पारगे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: कोल्हापूर: गणेश मूर्तीवरील चांदीचे दागिने लंपास

भारती शेवाळे यांनी पक्षाची सामान्य कार्यकर्ती म्हणून राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे पक्षाने पुढे शेवाळेवाडी महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा, प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस, प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा, पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरिक्षक आदी पदांवर त्यांनी काम केले आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या जिल्हा मुख्य प्रचारक, हवेली तालुका यशस्विनी सामाजिक अभियान समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना जिल्हा महिलाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

loading image
go to top