
लोणावळ्यात एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पीडितेनं पोलिसात तक्रार दिली असून तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरी जात असलेल्या स्थानिक तरुणीवर अत्याचार झाल्याच्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.